नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत 18 हजार 930 क्युसेस पाण्याचा विसर्ग

नाशिक, घोटी, इगतपुरी व धरण कार्यक्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणपरिक्षेत्रात पाणीसाठ्यात चांगली वाढ होताना दिसत आहे. गोदावरी नदीत नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून 18 हजार 930 क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी नदीतून आत्तापर्यंत 54 हजार क्युसेक पाणी जायकवाडीला सोडण्यात आले आहे.

दारणा धरणांत ८५.५१ टक्के तर गंगापूर धरणा ७० टक्के पाणी साठा झाला असून भाम, भावली धरणे पुर्णपणे भरले आहेत. दोन महिन्यांत नांदुर मध्यमेश्वर बंधा-यातुन गोदावरी नदीतुन ५४ हजार ६३६ क्युसेक्स म्हणजेच ४७२२ दशलक्ष घनफुट पाणी वाहुन गेले आहे. गंगापूर धरण ७८ टक्के भरल्यानंतर जायकवाडी साठी गोदावरी नदीतून पाणी सोडले जाणार आहे. पाउस कमी जास्त होत असल्यांने गोदावरी नदीतील पाण्यांचा दैनंदिन विसर्ग कमी अधिक प्रमाणांत होत आहे. २ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे मिलीमिटरमध्ये तर कंसातील आकडे एकुण पावसाचे आहेत.

दारणा ३३ (६३८), मुकणे २८ (७२३), वाकी ४५ (१२१९), भाम ६० (१७४२), भावली ९६ (२२४७), वालदेवी ६ (४७०), गंगापुर ६० (७९४), काश्यपी ४२ (७१८), गौतमी ५७ (८०३), कडवा १४ (३५७), आळंदी ३१ (४५६), पालखेड १३(१७५), करंजवण १५(४७८), ओझरखेड ४० (३९०), वाघाड ४० (४३९), नांदुर मध्यमेश्वर ३(१६७), नाशिक १६ (४२६), घोटी ० (९९८), ईगतपुरी ६९ (१६०६), त्रंबकेश्वर ५०(११५९), देवगांव ३ (२७५), ब्राम्हणगांव ० (२८८), कोपरगांव १ (२२८), पढेगांव ० (२२८), सोमठाणे (२०९), कोळगांव ० (२४८), सोनेवाडी (१७३), शिर्डी ० (२५१), राहाता ० (१८८), रांजणगांव खुर्द ० (२१४), चितळी ६ (२०८), याप्रमाणे पाउस झाला आहे. धरणांतील पाणीसाठा टक्के, तर कंसातील आकडे उपलब्ध पाणी दशलक्ष घनफुटमध्ये पुढीलप्रमाणे.

दारणा ८५ टक्के (६११३ दलघफु), मुकणे ४० टक्के (२९६३) वाकी ५३ टक्के (१३२४), भाम १०० टक्के (२४६४), भावली १००टक्के, (१४३४), वालदेवी ८१ टक्के (९२७), गंगापुर ६९ टक्के (३८९३), काश्यपी ३४ टक्के (६४४), गौतमी ६७ टक्के (१२५४), कडवा ८५ टक्के (१४४२), आळंदी ४२टक्के (३४७), पालखेड ६३ टक्के (४१४), करंजवण २४ टक्के, (१३३६), असा पाणीसाठा आहे. कोपरगांव शहर व तालुक्यात सध्या रिमझिम पाउस आहे. शनिवारी सकाळी शहरात पंधरा मिनीटे चांगल्या प्रमाणांत पाउस झाला. घरण कार्यक्षेत्रात ब-यापैकी पाउस असल्याने शहराचा पाणीपुरवठा ८ दिवसाआड होण्याची शक्यता आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जेथे जेथे पाणी साठलेले आहे त्या ठिकाणी डास निर्मुलनासाठी गप्पी मासे सोडण्याची मोहिम हाती घेतली आहे.

मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात दिनांक तीन ते सात ऑगस्ट दरम्यान मध्यम पावसाची शक्यता असल्याचे म्हटले आहे, तसेच कमाल तपमान २६ ते ३० डिग्री सेंटीग्रेड व किमान तापमान २२ ते २० डिग्री सेंटीग्रेड दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग १८ ते २८ किलोमीटर /तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे दिनांक ४ ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नाशिक जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस व जिल्ह्याच्या मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.