मानेवर चेंडू लागून 18 वर्षीय क्रिकेटरचा मृत्यू

20


सामना ऑनलाईन । श्रीनगर

श्रीनगर मध्ये मानेवर चेंडू लागून एका 18 वर्षीय तरूण क्रिकेटरचा मृत्यू झाला आहे. या मृत खेळाडूचे नाव जहांगीर अहमद वार असे आहे.

गुरूवारी अनंतनाग येथे सुरू असलेल्या यूथ सर्विसेस अॅंड स्पोर्टसद्वारे आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये ही दुर्घटना घडली. बडगाम आणि बारामूला या दोन जिल्ह्यांच्या सामन्यादरम्यान बारामूला कडून जहांगीर फलंदाजी करत होता. तेव्हा गोलंदाजाने फेकलेला चेंडू उसळी घेऊन  जहांगीरच्या मानेवर जोरात आदळला.

चेंडू आदळल्यानंतर जहांगीर जागीच बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. जम्मू कश्मीर राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जहांगीरच्या कुटुंबीयांना पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.  तसेच तरुण क्रिकेटपटूच्या मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या