… म्हणून गेल्या १० वर्षापासून ‘ती’, ‘तो’ बनून राहतेय

सामना ऑनलाईन । काबुल

अफगानिस्तानचा पूर्व प्रांत नांगरहार येथील एका गावामध्ये एक तरुणी गेल्या १० वर्षापासून मुलगा बनून राहात आहे. सितारा वफादार असे या १८ वर्षीय तरुणीचे नाव आहे. सिताराला पाच बहिणी आहेत आणि त्यांना भाऊ नसल्याने आई-वडिलांच्या सांगण्यामुळे तिला मुलाच्या वेशात जगावे लागत आहे.

seetara1

अफगानिस्तानात ‘बाशा पोशी’ या परंपरेचे पालन केले जाते. ‘बाशा पोशी’ परंपरेमध्ये पितृप्रधान समाजात कुटुंबातील महत्त्वाची भूमिका मुलगा निभावत असतो. याच परंपरेनुसार सिताराला एक दशकापासून मुलाच्या वेशात सर्वत्र वावरावे लागत आहे.

याबाबत बोलताना सितारा म्हणाली की, मी कधी असा विचारच केला नाही की मुलगी आहे. माझ्या वडिलांनी नेहमीच मला मोठ्या मुलाप्रमाणे वाढवले आहे. कधी-कधी मुलगा म्हणून मी अनेक कार्यक्रमामध्ये भागही घेतला आहे.

सितारा आणि तिचे कुटुंब विट-भट्टीवर कामाला जातात आणि त्यातून मिळणाऱ्या कमाईत त्यांच्या कुटुंबाला पोट भरावे लागते. या भागात आणखीही काही मुली मुलाच्या वेशात राहतात. परंतु वयात आल्यानंतर त्या मुलाचे कपडे घालण्यास बंद करतात आणि मुलीप्रमाणे सामान्य जीवन जगतात. परंतु याबाबत सिताराने सांगितले की, वयात आल्यानंतरही मी पुरुषांचे कपडे घालण्यास सुरू ठेवले कारण विट-भट्टी आणि स्वत:चे रक्षण करता यावे. सितारा एका दिवसात ५०० विटा तयार करते आणि त्याबदल्यात तिला २ डॉलर मिळतात.

आपली प्रतिक्रिया द्या