जबरदस्त पंच बसल्याने महिला बॉक्सर कोसळली, रुग्णालयात नेण्यापूर्वीच झाला मृत्यू

मेक्सिकोची बॉक्सिंगपटू जेनेट झकारिअस झपाटा हिचा अवघ्या 18 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. माँट्रीआल इथे सुरू असलेल्या स्पर्धेत तिचा मुकाबला मुकाबला मारी पिअर होऊलशी होता. मारीने मारलेल्या जबरदस्त पंचनंतर जेनेट बॉक्सिंग जबरदस्त जखमी झाली होती. मुकाबला मारीने जिंकल्याचे पंचांनी घोषित केल्यानंतर ती आनंदाने उड्या मारत होती, तर दुसऱ्या कोपऱ्यात जेनेत मृत्यूशी संघर्ष करत होती.

जेनेटच्या प्रशिक्षकांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तिची शुद्ध हरपत गेली आणि ती रिंगमध्येच कोसळली. कोसळत असताना जेनेटला आकडी आली होती. सामन्यातील चौथ्या फेरीत मारीने मारलेला अपरकट तिच्या वर्मी बसला होता. आकडी आल्यानंतर जेनेट रिंगमध्येच कोसळली. तिला तिच्या प्रशिक्षकांनी, पंचांनी उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तिची शुद्ध हरपली होती. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात हलविले होते.

5 दिवसांपूर्वी हा सामना झाला होता. शुक्रवारी जीव्हीएम गॅला इंटरनॅशनल ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या इवान मायकल यांनी एक घोषणा केली, ज्यात त्यांनी सांगितलं की ‘हे कळवताना मला अत्यंत दु:ख होत आहे की जेनेटच्या घरच्यांनी तिचे शुक्रवारी 3.45 वाजता निधन झाल्याचे कळवले आहे’ या घटनेने स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या सगळ्यांना धक्का बसल्याचंही इवानने म्हटलं आहे . जेनेटला रुग्णालयात दाखल केल्याचं कळाल्यानंतर मारीने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे, ज्यात तिने म्हटलंय की ‘बॉक्सिंगमध्ये जोखीम बरीच असते. मात्र प्रतिस्पर्ध्याला जीवानिशी ठार मारण्याचा विचार कुठल्याही बॉक्सरच्या मनात नसतो. जेनेट लवकर बरी व्हावी अशी मी प्रार्थना करते. ‘

आपली प्रतिक्रिया द्या