अनोळखी व्यक्तीकडून घेतले ड्रिंक, त्यानंतर मुलीची झाली भयंकर अवस्था

ब्रिटनमधील एका महिलेने तिच्या 18 वर्षाच्या मुलीचा भयंकर व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिची मुलगी विचित्र अवस्थेत दिसत आहे. मुलीचे हात व तोंड वाकडे झालेले दिसत आहे. मुलीला अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्या मुलीच्या अवस्थेकडे पाहून मन हेलावून जाते. या व्हिडीओतून त्या महिलेने मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला आहे.

मिली तापलिन असे त्या मुलीचे नाव असून ती नुकतीच 18 वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी ती मित्र मैत्रीणींसोबत साऊथन शहरातील मू मू नाईट क्लबमध्ये पार्टी करायला गेली होती. तिथे तिला एका अनोळखी व्यक्तीने ड्रिंक दिले. तिने देखील कोणताही विचार न करता ते ड्रिंक घेतले. पण ते ड्रिंक प्यायल्यानंतर तिला अर्धांगवायूचा झटका आला. मुलीची अवस्था पाहून तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली.

या घटनेनंतर मिलीच्या आईने तिच्या अवस्थेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओतून त्यांनी कुणीही अनोळखी व्यक्तींकडून ड्रिंक घेऊ नका असे आवाहन केले आहे. ‘माझ्या मुलीसोबत जे घडले ते इतर कुणासोबतही घडू नये यासाठी मी हा व्हिडीओ शेअर केला आहे’, असे मिलीची आई क्लेयर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या