1807 स्वयंसेवी संस्था परदेशी मदतीपासून मुकणार, केंद्राने रद्द केले एफसीआरए रजिस्ट्रेशन

515

कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आल्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने या वर्षी आतापर्यंत देशातील तब्बल 1807 स्वयंसेवी संस्था आणि काही शैक्षणिक संस्थांचे ‘फॉरेन कॉण्ट्रिब्युशन रेग्युलेशन ऍक्ट’ (एफसीआरए) अंतर्गत असलेले रजिस्ट्रेशन मंगळवारी रद्द केले. यामुळे या एनजीओज्ना आता परदेशातून मदत मिळणार नाही. याचा फटका ‘इन्फोसिस फाऊंडेशन’सहित राजस्थान विद्यापीठ, अलाहाबाद कृषी संस्था, वायएमसीए, गुजरात ऍण्ड स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटी वगैरेंचाही समावेश आहे.

गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱयाने याबाबत माहिती देताना सांगितले की, हे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात आल्याने या स्वयंसेवी संस्थांना परदेशातून मदत मिळणार नाही आणि तेथून मदत मागविताही येणार नाही. अनेक वेळा मागणी करूनही गेल्या सहा वर्षांत या स्वयंसेवी संस्थांनी परदेशातून आपल्याला किती निधी मिळाला याची माहिती गृहमंत्रालयाला दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचेही या अधिकाऱयाने स्पष्ट केले. ‘इन्फोसिस फाऊंडेशन’ या बंगळुरूस्थित स्वयंसेवी संस्थेने स्वतःच आपले हे रजिस्ट्रेशन रद्द करावे अशी मागणी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या