लातूर मध्ये कोरोनाग्रस्त महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू, जिल्ह्यात रुग्णांच्या मृत्यूची संख्या 19 वर

1417

लातूर मध्ये विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेमध्ये उपचार घेत असलेल्या कोरणाग्रस्त 64 वर्षाच्या महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या यामुळे 19 वर पोहोचली आहे.

लातूर तालुक्यातील मौजे साई येथील 64 वर्षाच्या महिलेस दिनांक 30 जून रोजी विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात कोरोना मुळे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दिनांक दोन जुलै रोजी सदरील महिलेचा मृत्यू झाला. कोरोनामुळे लातूर जिल्ह्यात मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 19 वर पोहोचली आहे. विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेमध्ये मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या बारा असून उदगीर येथे ग्रामीण रुग्णालयात मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या सहा आहे. एका रुग्णाचा मृत्यू पुणे येथील खासगी रुग्णालयात झालेला होता.

आपली प्रतिक्रिया द्या