पोहण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा बूडून मृत्यू

41

सामना प्रतिनिधी । नागपूर

वेणा जलाशय येथील तलावात पोहण्यासाठी गेल्या १९ वर्षीय तरुणाचा बूडून मृत्यू झाला आहे. अभिजीत राऊत असे या तरुणाचे नाव आहे. अभिजीत नवनीत नगरमध्ये रहात होता. त्याचे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. घरची सगळी मंडळी शुक्रवारी लग्नाला गेले होते. अभिजीत त्याचा मित्र पलाश केवटे याच्या वाढदिवसाला गेला. परिसरातील पाच- सहा मित्रांनी वेणा जलाशयाला जाण्याचा बेत आखला. सर्व मित्र चौदामैल परिसरात असलेल्या वेणा जलाशय परिसरात गेले. तिथे मित्राच्या वाढदिवसाची पार्टी साजरी केली. सायंकाळच्या सुमारास त्यांना या तलावात पोहण्याचा मोह आवरला नाही. अभिजीतने इतर मित्रांना पोहण्यासाठी विचारले.

मात्र, पोहता येत नसल्याने कुणीही तयार झाले नाही. शेवटी अभिजित एकटाच पोहण्यासाठी तलावात उतरला. पुढे काही अंतरावर गेला असता तो बुडू लागला. हे बघून सर्व मित्र घाबरले. त्यांनी आरडाओरडा केला. त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे घाबरून १०० क्रमांकावर फोन करून माहिती कक्षाला तसेच घरी व इतरांना माहिती दिली. त्यानंतर हिंगणा व कळमेश्‍वर पोलिसांनी घटनास्थळ गाठले व अभिजितला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस यशस्वी झाले नाही. रात्र झाल्याने शोधकार्य थांबवावे लागले. शनिवारी पुन्हा शोधकार्य सुरू केल्यानंतर त्याचा मृतदेह सापडला.

आपली प्रतिक्रिया द्या