भर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल

156

सामना ऑनलाईन । मुंबई

टीम इंडियाच्या एका फलंदाजाला सामना सुरू असताना एका महिलेने भर मैदानात येऊन किस केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ हल्लीचा नसून तब्बल 44 वर्षांपूर्वीचा आहे.

44 वर्षांपूर्वी म्हणजेच 1975 ला हिंदुस्थान विरुद्ध वेस्ट इंडिजचा कसोटी सामना सुरू होता. त्यावेळी ब्रिजेश पटेल हा फलंदाज मैदानावर फलंदाजी करत होता. ब्रिजेशचे अर्धशतक झाल्यानंतर स्टेडीयममध्ये बसलेली एक महिला धावत मैदानात आली व तिने क्रिझवर उभ्या असलेल्या ब्रिजेशची किस घेतली. त्यानंतर ती पुन्हा स्टेडियममध्ये निघून गेली.

सध्या ट्विटरवर सुरू असलेल्या #sareeTwitter या ट्रेंडवरून एका युझरने या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या