मॅराडोनाच्या ‘त्या’ गोलमुळे अर्जेंटिनाने जिंकला होता विश्वचषक

5


सामना ऑनलाईन । मुंबई

रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये विश्वचषकाचा प्रबळ दावेदार समजला जाणारा अर्जेंटिनाचा संघ काही खास कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे या संघाच्या खेळाडूंना जगभरातील चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. परंतु अर्जेंटिनासारखा लढवय्या संघ इतक्यात हार मानणार नाही. तर तो पुन्हा नव्या उमेदीने मैदानात उतरेल यावर फक्त अर्जेंटिनातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील क्रीडाप्रेमींचा विश्वास आहे. याचे उदाहरण चाहत्यांना १९८६च्या विश्वचषकामध्ये पहायला मिळाले होते.

अर्जेंटिनाच्या सर्व खेळाडूंपैकी लियोनेल मेस्सीचा चाहता वर्ग सर्वात जास्त आहे. मेस्सीप्रमाणेच डिएगो मॅराडोनाचाही चाहता वर्ग मोठा आहे. मॅराडोनाने १९८६च्या विश्वचषकामध्ये इंग्लंड विरूद्धच्या क्वॉर्टर फायनलच्या अटीतटीच्या लढतीमध्ये गोल करत अर्जेंटिनाला विजय मिळवून दिला होता.

द गार्डियने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या सामन्यामध्ये इंग्लंडचा संघ पहिल्या सत्रामध्ये एका गोलने आघाडीवर होता. परंतु, अर्जेंटिनाने संधी साधत असे काही केले की, ज्यामुळे संपूर्ण खेळच अर्जेंटिनाच्या पारड्यात गेला. ५१व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू जॉर्ज वल्दानोने बॉल मॅराडोनाच्या दिशेने हवेत मारला. मॅराडोनाने हेडर मारण्याचा प्रयत्न केला परंतु, बॉल त्याच्या हाताला लागून गोल झाला. इंग्लंडच्या खेळाडूंना या गोष्टीचा निषेध केला. परंतु, सामन्याचे रेफ्री असलेल्या ट्यूनीशियाच्या अली बिन नसरने गोल दिला.

रेफ्रीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी बॉल खेळाडूच्या हाताला लागताना पाहिलेच नाही. यानंतर मॅराडोनाने आणखी एक गोल करून अर्जेंटिनाला विजय मिळवून दिला. या सामन्यामध्ये विजय मिळवल्यानंतर अर्जेंटिनाने अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवत विश्वचषकावर आपले नाव कोरले.

आपली प्रतिक्रिया द्या