नाशिकमध्ये सुमारे १ कोटीच्या जुन्या नोटा जप्त

13

सामना प्रतिनिधी । नाशिक

व्यवहारातून बाद करण्यात आलेल्या सुमारे १ कोटी रुपयांच्या ५०० आणि १००० रुपयाच्या जुन्या नोटा नाशिक येथे जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच जणांसह एक झायलो कार देखील जप्त करण्यात आली आहे.

५०० आणि १०००च्या जुन्या नोटा व्यवहारातून बाद झाल्या असून देखील त्या बदलण्यासाठी गैरप्रकार सुरू आहेत. नाशिक पोलिसांना याची माहिती मिळाली होती. नाशिकच्या द्वारका पोलीस ठाण्यात झायलो गाडीचा तपास सुरू असताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ५०० आणि १०००च्या जुन्या नोटा आढळल्या. या नोटांची मोजणी सुरू असून ही १ कोटीच्या जवळपास जाणारी आहे, असे सांगण्यात आले आहे. या कारवाईत ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये काही जण नाशिक तर काही नगर भागातील असल्याचे सांगण्यात येते. एवढी मोठी रक्कम कोणाकडून आणि ती रक्कम कुठे पोहोचवणार होते, याची चौकशी सध्या नाशिक पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या