शिवरायांचा पुतळा 2.40 कोटींचा अन् तात्पुरत्या हेलिपॅडसाठी 2.2 कोटींचा खर्च

मालवणच्या राजकोटवर शिवपुतळा उभारण्यासाठी सरकारने 2 कोटी 40 लाख रुपये खर्च केला आणि त्याच्या अनावरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हणून तात्पुरत्या हेलिपॅडसाठी 2 कोटी 2 लाख रुपये खर्च करण्यात आले, वारे व्वा सरकार! अशी पोलखोल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

मिंधे सरकारविरोधात हायकोर्टात याचिका
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने मिंधे सरकारने जगभरात भारताची लाज घालवली आहे. हे सरकार दिशाभूल करणारा गुन्हा नोंदवून बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांना पाठीशी घालत आहे, असा आरोप करणारी फौजदारी जनहित याचिका केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात दाखल केली. या घटनेसाठी नौदल व पीडब्ल्यूडी अधिकारी जबाबदार आहेत या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली.