कारचा अपघात, दोन अभिनेत्यांचा मृत्यू

22

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एका भीषण कार अपघातामध्ये दोन अभिनेत्यांसह ३ जणांचा मृत्यू झाला आहे. उमरगाव येथील चित्रिकरण संपल्यानंतर मुंबईकडे परत येत असताना हा अपघात झाला. अपघातात मरण पावलेले दोन्ही अभिनेते कलर्स चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या ‘महाकाली’ या मालिकेमध्ये काम करत होते. गगन कंग आणि अर्जित लवानिया अशी मृत अभिनेत्यांची नावे आहेत. अपघातामध्ये एका स्पॉटबॉयचाही मृत्यू झाला आहे.

महाकाली मालिकेमध्ये गगन देवांचा राजा इंद्र आणि अर्जित नंदीची भूमिका करत होते. दोघेही अभिनेते सलग दोन दिवसांपासून चित्रिकरणामध्ये व्यस्त होते. शनिवारी सकाळी चित्रिकरण संपवून मुंबईमध्ये परत येत असताना अहमदाबाद हायवेवर कारची एका कंटनेरसोबत जोरदार टक्कर झाली. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचुर झाला. ड्रायव्हर सीटवर बसलेला गगन आणि शेजारी बसलेला अर्जित यांचा या अपघातात मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या