संताजनक! चार वर्षापासून सख्ख्या बहिणीवर दोन भावांचा शेकडो वेळा बलात्कार

132
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मेरठ

उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे नात्यांना काळीमा फासणारा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. येथे गेल्या अनेक वर्षापासून दोन भाऊ आपल्या सख्ख्या बहिणीवर बलात्कार करत असल्याचे समोर आले आहे. दोन भाऊ आपल्या अल्पवयीन सख्ख्या बहिणीवर गेल्या 4 वर्षापासून बलात्कार करत होते. बहिणीने या बाबत तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरठ येथील 12 वी च्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीने गेल्या चार वर्षापासून दोन सख्खे भाऊ बलात्कार करत असल्याचा आरोप केला. दोघे भाऊ तिला ही गोष्ट बाहेर सांगण्याची धमकी देत होते. परंतु पीडितेने मोठ्या शिताफीने त्यांचा हा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद केला आणि एका एनजीओच्या मदतीने तिने पोलिसात तक्रार दाखल केली. पीडितेची ही आपबीती ऐकूण पोलीसही चक्रावून गेली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही भावांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.

दरम्यान, पोलीस सध्या पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करत आहेत. तसेच प्राथमिक तपासामध्ये दोन्ही भावांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. सध्या दोघेही तुरुंगात असून पुढील कारवाई सुरू असल्याचे एसपी रणविजय सिंह यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या