केबीसीसाठी २ कोटी स्पर्धकांनी केले रजिस्ट्रेशन

सामना प्रतिनिधी । मुंबई

महानायक अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय क्वीझ शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या नवव्या सीजनला लवकरच सुरूवात होणार आहे. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी चाहत्यांना इतके उत्सुक आहेत की, आतापर्यंत तब्बल दोन कोटी स्पर्धकांनी या शोमध्ये भाग घेण्यासाठी रेजिस्ट्रेशन केले आहे. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी १७ जूनला रात्री नऊ वाजल्यापासून नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली होती. इतर सीजनच्या तुलनेत या सीजनमध्ये स्पर्धकांच्या रेजिस्ट्रेशनचा आकडा खूप मोठा आहे. यावरूनच स्पर्धकांमध्ये असलेली या शोची लोकप्रियता स्पष्ट होतेय.

आपली प्रतिक्रिया द्या