आश्चर्य… नवऱ्याच्या बायकोला किडनीचे दान, लग्नानंतर दोनच दिवसांत घेतला निर्णय

लग्नात वर-वधूला गिफ्ट देण्याची प्रथा आहे, पण फ्लोरिडा येथील एका नववधूने लग्न झाल्यानंतर दोनच दिवसांत नवऱ्याच्या पहिल्या पत्नीला एक अनोखे गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला.

डेबी असे या नववधूचे नाव असून ती फ्लोरिडामध्ये राहते. डेबी आणि जिम स्ट्रिकलँड बऱ्याच वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहात होते. याच दरम्यान जिमची पहिली पत्नी मायलेन मेरथे हिच्यासोबतही त्याचा सुखी संसार सुरू होता. जिम आणि त्याची पहिली बायको मायलेन मेरथे यांना दोन मुले आहेत. दोन्ही मुलांचे पालनपोषण ते दोघे उत्तमरित्या करतात, मात्र आता हे नवरा-बायको एकत्र राहात नाहीत तसेच याबाबत त्या दोघांचीही काहीही तक्रार नाही.

काही दिवसांपासून मायलेन किडनीच्या आजाराने त्रस्त होती. डॉक्टरांनी तिला किडनी प्रत्यारोपण करणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. याच दरम्यान जिम आणि डेबीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. डेबीला मायलेनच्या आजाराविषयी माहिती होती. मायलेनच्या भावाची किडनी तिला मॅच झाली नाही. त्यामुळे डेबी  स्वखुशीने मायलेनला किडनी दान करायला तयार झाली. लग्नानंतर दोनच दिवसांत मायलेनला डेबीने किडनी दान केल्यामुळे लोकांनी तिचे नाव ‘किडनी सिस्टर’ असे ठेवले तसेच ‘किडनी दानाचा दिवस हा माझ्या आयुष्यातला महत्त्वपूर्ण आणि आनंददायी दिवस होता’, असे डेबी सांगते.

आपली प्रतिक्रिया द्या