कांदा भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने २ महिलांचा मृत्यू

36

सामना ऑनलाईन,शिरूर

शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई इथे झालेल्या एका विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. या महिला कांदेकाढणीनंतर कांदे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत भरून घरी जात होत्या. यावेळी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला जोडणारी पिन निघाली आणि हा अपघात झाला

पिन निघाल्याने ट्रॉली पूर्णपणे उलटली. या ट्रॉलीचा फाळका डोक्यावर पडल्याने लताबाई चव्हाण आणि सुशिलाबाई साठे या दोघींचा मृत्यू झाला. या अपघातात एक महिला जखमी झाली असून तिच्यावर न्हावरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या