सिन्नरला दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नाशिक – सिन्नर तालुक्यात पाच दिवसात दोन शेतकऱ्यांनी विषारी औषध सेवन करत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

शिवडे येथील अरुण दौलत सोनकांबळे (४५) यांनी १७ मार्चला विषारी औषध प्राशन केले, त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना प्रथम देवळाली कॅण्टोन्मेंट हॉस्पिटल येथे दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला.

सोनगिरी येथील शिवाजी भिकाजी बोडके (४५) यांनी काल वीष प्राशन केले. त्यांचा नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला, अशी माहिती तहसील कार्यालयाने दिली.

आपली प्रतिक्रिया द्या