स्वीडन ते बॉलिवूड व्हाया हिंदुस्थान

91

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमध्ये काहीतरी करावं अशी आशा मनात ठेवून अनेकजण रोज मुंबईत दाखल होतात. तसे ते दोघेही आले.. अगदी पार स्वीडनहून. परका देश, परकी माणसं यात बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेता घेता त्यांना एक भन्नाट कल्पना सुचली. मुंबईच्या सर्वसामान्य जीवनाचं निरीक्षण करत त्यांनी ते आपल्या छोट्या छोट्या व्हिडिओमधून सादर केलं. त्या व्हिडिओंना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला.

हम्पस बर्गीविस्ट आणि जोहान बार्टोली अशी या अवलियांची नावं आहेत. अवघ्या पंचविशीच्या आसपास असलेले हे दोघे ‘टू फॉरेनर्स इन बॉलिवूड’ ही अफलातून व्हिडिओमालिका सादर करतात. मुंबईतल्या सामान्य माणसाचं जीवन, त्यातल्या गमतीजमती, खास ‘मुंबईकरी’ वैशिष्ट्य अशा सगळ्यांनी पुरेपूर असलेले त्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर बघितले जात आहेत. बॉलिवूडमध्ये नाव कमवण्याच्या हेतूने ते मुंबईत दाखल झाले होते. विशेष म्हणजे त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळत असून बँजो, रुस्तम अशा चित्रपटांमधूनही त्यांनी अभिनय केला आहे.

पाहा व्हिडिओ-


आपली प्रतिक्रिया द्या