दहशतवाद्यांच्या २ ‘गाईड’ना हिंदुस्थान सोडून देणार ?

13
प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन,श्रीनगर

ऊरीमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना लष्कराच्या तळामध्ये घुसण्यासाठी मदत करणाऱ्या २ पाकड्यांना सबळ पुराव्याअभावी हिंदुस्थानी सरकार सोडून देण्याची शक्यता आहे. चंदू चव्हाणला हिंदुस्थानात पाठवल्याच्या बदल्यात दहशतवाद्यांच्या या दोन साथीदारांना सोडून देण्याचा कनवाळूपणा मोदी सरकारने दाखवण्याचं ठरवत असल्याचं कळतंय.अवान आणि खुर्शीद अशी या दोघांची नावे असून त्यांच्या विरोधात सबळ पुरावे न सापडल्याने त्यांना सोडलं जाणार असल्याचं गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितलं आहे. ऊरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १९ जवान शहीद झाले होते.

अवान आणि खुर्शीदने चौकशीदरम्यान हिंदुस्थानी सैन्याला माहिती दिली होती की जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरने दहशतवाद्यांना लष्कराच्या तळामध्ये घुसण्यासाठी आम्हाला मदत करण्याचे आदेश दिले होते. या दोघांनी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांमधील हफीज अहमदला देखील ओळखलं होतं. मात्र तरीही त्यांच्याविरोधात पुरावे नसल्यानं सांगत राष्ट्रीय तपास संस्था त्यांना मोकळं सोडण्याच्या तयारीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या