फक्त 55 लाखांत वाढवली 2 इंच उंची !

कॉस्मेटिक सर्जरीद्वारे शारीरिक सौंदर्य वाढवले जाते. शरीरावरील नको असलेले तीळ, खुणा, सुरकुत्या सौंदर्यचिकित्सेच्या आधारावर लपवता येऊ शकतात, मात्र इथे तर एका व्यक्तिने सौंदर्य उपचाराच्या बळावर आपली उंची वाढवून घेतली आहे. या उपचारामुळे त्याचे उंच होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

अमेरिकेत डेल्लास येथे राहणाऱ्या अलफोंसो फ्लोर्स (28) या व्यक्तिची उंची आधी 5 फूट 11 इंच होती. कॉस्मेटिक सर्जरीद्वारे शस्त्रक्रिया करवून घेऊन त्याची उंची 6 फूट 1 इंच झाली आहे. म्हणजे शस्त्रक्रियेद्वारे त्याची उंची आता चक्क दोन इंचाने वाढली आहे. फ्लोर्स वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी असून त्याला नेहमी आपण उंच असायला हवे असे वाटायचे. त्याच्या शरीराची उंची वाढल्याची स्वप्ने तो पाहात असे. एक दिवस त्याने लिंब लेंथनिंग सर्जरी करून घेऊन आपली उंची कायमस्वरुपी वाढवण्याचे ठरवले. याकरिता त्याने 55 लाख रुपये खर्च केले आहेत, असे वृत्त ‘डेली मेल’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

फ्लोर्सने शस्त्रक्रियेच्या पूर्वी आणि नंतर काढलेली स्वत:ची छायाचित्रेही सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये त्याची उंची वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. उंची वाढवण्याविषयी फ्लार्स सांगतो की, ब-याचशा लोकांना उंच व्यक्ती आवडतात. माझी उंची 5 फूट 11 इंच आहे, म्हणजे फारच कमी नाही, हे मला माहीत होते. तरीही मला शरीराची उंची अजून थोडी वाढवायची होती. कारण याद्वारे माझ्यातील चपळता वाढेल, असे मला वाटते.

लिंब लेंथनिंग सर्जरी म्हणजे…

लास वेगास येथे असलेल्या द लिम्बप्लैक्स इन्स्टिट्यूटमधील ऑर्थोपेडिक सर्जन केविन देवीप्रसाद यांनी अलफोंसो फ्लोर्सवर शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेद्वारे शरीराची उंची वाढवता येऊ शकते. ही शस्त्रक्रिया करून गुडघा आणि मांड्यांच्या हाडांमध्ये वाढ करण्यात येते. ही अत्यंत खर्चिक शस्त्रक्रिया आहे, असा दावा डॉक्टर केविन देबीप्रसाद यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या