मुख्यमंत्री सहाय्यता निधीला श्री क्षेत्र रांजणगाव देवस्थानच्या वतीने 2 लाख 51 हजार रुपयांचा धनादेश

226

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरग्रस्तांसाठी 2 लाख 51 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी बुधवारी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  चंद्रकांत दादा पाटील यांच्या कडे श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. विजयराज दरेकर, उपाध्यक्ष प्रा. नारायण पाचुंदकर, सचिव डॉ. संतोष दुंडे यांनी सुपूर्द केला.

त्यावेळी खासदार गिरीश बापट साहेब, जिल्हाधिकारी श्री. नवलकिशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी सौ. जयश्री कटारे यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या