रत्नागिरी जिल्ह्यात 2 लाख 29 हजारजण दाखल; कोरोनाबाधितांची संख्या 1992 वर

899

परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात 3 ऑगस्टपर्यंत एकूण 2 लाख 29 हजार 496 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 1 लाख 9 हजार 942 आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात आलेल्या अहवालांमध्ये 60 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1992 झाली आहे. तर 31 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1335 झाली आहे. मंगळवारी बरे झालेल्यांमध्ये कोव्हीड रुग्णालय 6, समाजकल्याण मधील 9 आणि केकेव्ही, दापोली येथील 16 रुग्णांचा समावेश आहे. कोकणनगर येथील 65 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मंगळवारी उपचार दरम्यान मृत्यू झाला. तसेच राजापूर येथील 58 वर्षीय तर हर्णे, दापोली येथील 67 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 66 झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या