सेक्स रॅकेटप्रकरणी महाराष्ट्रातील दोघांना गोव्यात अटक

299

सामना वृत्तसेवा । पणजी

कळंगुट पोलिसांनी बुधवारी आगरवाडो येथून चालवले जात असलेले सेक्स रॅकेट उध्वस्त करून महाराष्ट्रातील २ दलालांना अटक केली आहे. त्याशिवाय प.बंगाल मधील २ युवतींची सुटका करण्यात यश मिळवले आहे.

पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांना खात्रीशीर सूत्रांकडून या सेक्स रॅकेटची माहिती मिळाली होती.त्यानंतर त्यांनी सवेरा या एनजीओच्या मदतीने सापळा रचून पुणे येथील आशीष शर्मा आणि ठाणे येथील मेघना नायर या दोन दलालांना अटक केली. त्यांच्याकडून ७ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी या कारवाई मध्ये प.बंगाल मधील २ युवतींची सुटका करून त्यांची रवानगी मरेशी येथील सुधारगृहात केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. ड्रग्स आणि वेश्याव्यवसायाला राज्यात अजिबात थारा देणार नसून यापुढे देखील कारवाई सुरुच राहणार असल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या