सेल्फी जीवावर बेतला, दोन तरुणांचा धरणात बुडून मृत्यू

36

सामना प्रतिनिधी । नागपूर

बोर धरणात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. एकाचा पाय घसरला तर त्याला पकडायला दुसरा गेला असता दोघांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. पंकज गायकवाड (२१) आणि निखिल काळबांधे (२९) असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. मृत दोन्ही तरुण हे नागपूरचे रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे.

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोरधरण येथील निसर्गरम्य वातावरणाचे आनंद लुटण्यासाठी काही युवा मंडळी मित्रांसह येथे आले होते. सध्या धरण भरल्यामुळे तेथील विहंगम द्रुष्य पाहता सेल्फी काढण्याचा नाद ते आवरू शकले नाही. सेल्फी काढताना एकाचा पाय घसरला. तो पडत असल्याचे पाहून सोबत असलेल्या मित्राने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्याचा ही तोल सुटला. अशा प्रकारे दोघांना सेल्फी मुळे जीव गमवावा लागला. या घटनेची फिर्याद सोबत असलेल्या हिमांशु याने सेलू पोलिसांना दिली असून दोन्ही तरुणांचे शव काढण्यात आले आहे. पुढील तपास सेलू पोलीस करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या