बुलढाणा जिल्ह्यात 11 अहवाल कोरोना निगेटिव्ह; 2 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

1084

बुलढाण्यातून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 13 अहवाल मंगळवारी मिळाले आहेत. यापैकी 11 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 2 अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव आलेले अहवाल नांदुरा येथील 45 वर्षीय महिला व खामगाव येथील 31 वर्षीय युवकाचा आहे.

आतापर्यंत 1285 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण 69 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 43 कोरोनाबधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशाप्रकारे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 43 आहे. सध्या रूग्णालयात 23 कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच मंगळवारी 13 अहवाल मिळाले आहेत. तसेच 46 नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत 1285 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या