डॉक्टर नसल्याने दोन रुग्णांचा मृत्यू

11

सामना ऑनलाईन, चेन्नई

ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी गोरखपूरमध्ये सरकारी रुग्णालयात ७०हून अधिक बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच तामीळनाडूत वेल्लोरमधील अंबर सरकारी रुग्णालयात दोन रुग्णांचा उपचारांसाठी डॉक्टर नसल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी तीव्र स्वरूपाचा संताप केला आहे. यानंतर या रुग्णालयाने आपली चूक मान्य केली आहे.

अपघातात जखमी झालेले टॅक्सीचालक राजकुमार आणि छातीत दुखू लागल्याने वैष्णवी नामक तरुणीला या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पहिल्या रुग्णावर उपचारासाठी दोन तास डॉक्टरच मिळाला नाही तर दुसऱ्या रुग्णावर उपचारासाठी तासभर डॉक्टर उपलब्ध झाला नाही. शेवटी या दोन्ही रुग्णांचा उपचारादरम्यान नंतर मृत्यू झाला. यावरून नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले.

आपली प्रतिक्रिया द्या