मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघातात २ ठार

सामना ऑनलाईन । नाशिक
मुंबई-नाशिक महामार्गावर टवेरा कार आणि गॅस कंटेनर यामध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर असणाऱ्या के. के. वाघ कॉलेजच्या गेटसमोर सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की टवेरा कारची पुढची बाजू कंटेनरच्या चाकाखाली घुसली.
मुंबईहून मालेगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या टवेरा कारने कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. टवेरा कार कंटेनरच्या चाका खाली घुसल्याने मदत कार्यात अडचण येत होती. अखेर कारचा पत्रा कापून कारमधील मृतदेह बाहेर काढण्यात आला. अपघातातील मृतांची नावं अद्याप कळू शकलेली नाहीत.
आपली प्रतिक्रिया द्या