कोल्हापुरात विहिरीत बुडून २ शाळकरी मुलांचा मृत्यू

16

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ढोल पाणंद परिसरात शनिवारी ही धक्कादायक घटना घडली आहे. आकाश हणमंत पाटील (८ वर्ष) आणि शिवाप्पा कामाण्णा पुजारी (१२ वर्ष) अशी मृत मुलांची नावं आहेत. दोघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नदीवेस नाका परिसरात मुजावरट्टी परिसरात आकाश आणि शिवाप्पा राहत होते. मित्रांसोबत ते ढोले पाणंद येथे एका विहिरीत पोहायला आले होते. दोघांनाही पोहता येत नसल्याने रबरी इनरच्या साहाय्याने ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र भीतीने दोघांनीही एकमेकांनी मिठी मारल्याने ते पाण्यात बुडाले. ही संपूर्ण घटना त्यांच्या मित्रांनी त्यांच्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरा अग्निशमन दलाच्या जवानांनी दिर्घ शोधमोहिमेनंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढले. दोघांचेही मृतदेहांचे आयजीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या