गुजरातमधून आयसिसशी निगडीत २ दहशतवाद्यांना अटक

11
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन, अहमदाबाद

गुजरातमधील दहशतवाद विरोधी पथकाने २ दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दोघेही आयसिसशी निगडीत असल्याचं सांगण्यात येत आहे. यातील एका दहशतवाद्याला भावनगर इतून अटक करण्यात आली तर दुसऱ्या दहशतवाद्याला राजकोटमधून अटक करण्यात आली आहे. वसिम आणि नईम अशी  या दोघांची नावे असून हे दोघेही सिरिया आणि इराक मधील आयसिसच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होते असं गुजरात एटीएसने सांगितले आहे.हे दोघेही सख्खे भाऊ असून दोघेही कॉम्प्युटर तज्ञ आहेत. या दोघांकडून गन पावडर आणि विस्फोटकं बनवण्यासंदर्भातली कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या