लस येण्याआधी 20 लाख मृत्यू होऊ शकतात, जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली भीती

कोरोना महामारीला रोखण्यासाठी हिंदुस्थानसह जगभरात लस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु त्यामध्ये अद्याप तरी पूर्णपणे यश आलेले नाही. लस येण्यापूर्वी कोरोनामुळे जगभरात मृतांची संख्या 20 लाख होऊ शकते, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) व्यक्त केली आहे. दरम्यान, अनलॉकमध्ये लोकांच्या भेटीसाठी वाढल्या. त्यामुळे संसर्ग वाढला असे निरीक्षणही ‘डब्ल्यूएचओ’ने मांडले आहे.

‘डब्ल्यूएचओ’चे इमर्जन्सी प्रोग्रामचे संचालक माईक रेयान यांनी ही भीती व्यक्त केली आहे. जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 3 कोटी 20 लाखांपेक्षा जास्त आहे. मृतांची संख्या 9 लाख 85 हजारांवर गेली आहे. कोरोनाची लस येण्यासाठी आणखी कालावधी लागेल. लस येण्याआधी जगभरात कोरोनामुळे मृतांची संख्या 20 लाखांपर्यंत जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

काय आहे परिस्थिती?

अमेरिकेत कोरोनामुळे मृतांची संख्या 2 लाखांवर गेली आहे. हिंदुस्थानात 93 हजार, ब्राझिलमध्ये 40 हजार, रशियात 20 हजारांचा मृत्यू झाला आहे.

अनेक देशांनी लॉकडाऊन संपविला आणि ‘अनलॉक’ केले; मात्र ‘अनलॉक’मध्ये लोक घराबाहेर पडत आहेत. गाठीभेठी वाढल्या, एकमेकांच्या घरी जाणे वाढले आहे. लहान प्रमाणात गेटटुगेदरसारखे कार्यक्रम होत आहेत. काही देशांमध्ये रेस्टॉरंट, बार उघडले आहेत. त्यामुळे हा संसर्ग पसरण्यासाठी केवळ तरूणांना जबाबदार धरता येणार नाही.

ब्रिटन आणि युरोपात कोरोनाची दुसरी लाट आल्याची भीती आहे. संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करणे किंवा काही इतर उपाययोजना केल्या पाहिजेत.

आपली प्रतिक्रिया द्या