आईसह नवजात बालकांनाही कोरोनाची लागण; रत्नागिरीत कोरोनाबाधितांचा आकडा 580 वर

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात प्रसूतीकरिता आलेल्या पाच गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली होती. या पाचपैकी दोन महिलांची प्रसूती झाल्यानंतर नवजात बालकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या दोन्ही बालकांना जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयु (बालकांचा अतिदक्षता विभाग) येथे उपचाराकरिता ठेवण्यात आले आहे. जिल्हयात आणखी 20 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 580 वर पोहचली आहे.

कोव्हीड केअर सेंटर घरडा, लवेल येथून 3 तर समाजकल्याण, रत्नागिरी येथून 1 जिल्हा रुग्णालय 1 आणि पेढांबे येथून 2 अशा एकूण 7 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 437 झाली आहे. सोमवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये शिरगाव 3,जेल रोड 2,मालगुंड 1,गावडे आंबेरे 1,राजिवडा 1,घरडा कॉलनी लवेल 6, कुंभारवाडा 1,पायरवाडी कापसाळ 2, पेठमाप 1, गोवळकोट 1,जुनी कोळकेवाडी 1 येथील रूग्णांचा समावेश आहे. सध्या रुग्णालयात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 119 आहे. यात पुन्हा दाखल केलेल्या रुग्णाचा समावेश आहे. सोमवारी साळवी स्टॉप, उद्मनगर, मारुतीमंदीर, रत्नागिरी, चर्मालय, भाटये,टिवंडेवाडी शिरगाव, बौध्दवाडी, मिरजोळे हे सात क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तसेच नर्सिंग हॉस्टेल, गोगटे कॉलेज ग्राऊंड शेजारी, झाडगाव नाका, मौजे साखरतर, मौजे मेर्वी, मौजे धामणसे, मौजे नरबे, मौजे लाजूळ, मौजे देवूड, मौजे उक्षी, मौजे नाणीज, मौजे भंडारपुळे,मौजे करबुडे कोंड, मौजे कशेळी, राजिवडा, मौजे नाचणे शांतीनगर, मौजे गणेशगुळे या भागात कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या कन्टेनमेंट झोनचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्याच्या सीमा पूर्ववत करण्यात आल्या.

जिल्हा रूग्णालयात दाखल झालेल्या एका रूग्णांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सुरुवातीला तो कोरोना पॉझिटिव्ह आहे असे सांगितले. मात्र नंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगितले. यासर्व गोंधळाचा मनस्ताप मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना झाला. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याप्रकारची गंभीर दखल घेऊन चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. तर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ढिसाळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त करताना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या