जिगोलो बनण्याची इच्छा महागात पडली, 20 वर्षाच्या तरुणाने घातला अनेकांना गंडा

जिगोला म्हणजेच पुरुष वेश्या बनण्याची इच्छा काही तरुणांना चांगलीच महागात पडल्याचे समोर आले आहे. एका 20 वर्षीय तरुणाने अशा काही तरुणांना चक्क 23 लाख रुपयांना गंडा घातला आहे. दिल्ली येथे हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी अंकित कुमार नावाच्या तरुणाला बिहारमधील खगारिया जिल्ह्यातील गावातून अटक केली आहे. तो दिल्लीतील उत्तम नगर भागात राहायचा. जिगोलो बनण्याची इच्छा असलेल्या तरुणांना हेरून त्यांना काम मिळवून देतो सांगत त्यांच्याकडून पैसे उकळायचा.

या प्रकरणी राकेश कुमार नावाच्या तरुणाने अंकित विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला. राके्श कुमार याने काम मिळविण्यासाठी अंकितला 11 हजार रुपये दिले होते. मात्र अंकितने पैसे मिळताच त्याचा नंबर ब्लॉक केला होता.

त्यावरून राकेशला आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्याने दिलेला नंबर व वेबसाईटच्या आधारे पोलिसांनी अंकितच्या मुसक्या आवळल्या. अंकितने आतापर्यंत अनेकांना अशाप्रकारे गंडवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या