नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान पदाचे उमेदवार ?

17

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

2019 च्या निवडणुका या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितलं आहे. रामलीला मैदानामध्ये भाजपचे निवडणुकीपूर्वीचे अखेरचे राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्यात आले असून त्याचा हा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनामध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना अमित शहा म्हणाले की आपल्याला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुढच्या निवडणुका लढायच्या असून या निवडणुकांमुळे भाजपला भाजप सरकारने केलेल्या कामांची माहिती घराघरात पोहचवण्याची संधी मिळणार आहे.

अमित शहा यांच्या या विधानामुळे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार हे नरेंद्र मोदीच असतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून दबक्या आवाजात चर्चा सुरू होती की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज असून त्यांच्याऐवजी दुसऱ्या नेत्याला पंतप्रधानपदासाठीचा उमेदवार म्हणून पुढे आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.

गडकरी सुस्साट; अपयशाची जबाबदारी पक्षाध्यक्षांचीच!

पुरुष नेत्यांपेक्षा इंदिरा गांधी अधिक कर्तृत्ववान, गडकरींच्या विधानाची जोरदार चर्चा

केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे नाव या दबक्या चर्चांमुळे पंतप्रधानपदासाठी निश्चित केले जाईल अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत होते. नितीन गडकरी यांच्या काही विधानांमुळे ते मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करत असल्याचं बोललं जात होतं. गडकरी यांनी मात्र आपल्या विधानाचे चुकीचे अर्थ लावले जात असल्याचं सांगितलं होतं.

मोदींऐवजी अमित शहांना हटवण्याकडे संघाचा कल, गडकरींना अधिक बळ देणार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या पंतप्रधानपदावर लवकरच मराठी माणूस दिसेल, असे सूचक वक्तव्य  केले होते.  त्यांचा रोख हा गडकरींकडेच असावा असे बोलले जात होते. अमित शहा यांनी यांनी मोदी यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवणार असल्याचं सांगत या सगळ्या शक्यतांना विराम दिल्याचं दिल्लीतील राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या