सेक्स केला तरी ते पलंग तुटणार नाहीत; कंपनीचा अजब दावा

3254

जपानची राजधानी टोकियोमध्ये या वर्षी होणाऱ्या ऑलंपिक सामन्यांसाठी सर्व वस्तू रिसायकल केलेल्या पदार्थांपासून बनवण्यात येत आहेत. त्यात मेडल, पंलग, अंथरूणे, खुर्च्या, टेबल यांचा समावेश आहे. रिसायकल केलेल्या कार्डबोर्डपासून येथील पलंग बनवण्यात आले आहेत. हे पलंग तकलादू असून त्यावर कोणीही झोपू शकणार नाही, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. त्यावर कंपनीने अजब दावा करत आपली बाजू मांडली आहे. या पलंगावर सेक्स केला तरी ते पलंग तूटणार नाहीत, असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे ही कंपनी आणि रिसायकल केलेल्या वस्तूंची सध्या चर्चा सुरू आहे.

ऑलंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना तकलादू पलंग देण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर रिसायल केलेल्या पदार्थांपासून बनवण्यात आलेल्या या वस्तूंची चर्चा सुरू झाली. हे पलंग 200 किलोग्रॅमपर्यंतचे वजन सहज पेलू शकतात. त्यामुळे या बेडवर दोन व्यक्ती झोपल्या तरी हे पलंग तूटणार नाहीत, असा दावा ऑलंपिक प्रशासनाने केला आहे. तसेच या पलंगावर सेक्स केला तरी हे पलंग तूटणार नाही, असा दावा हे पलंग बनवणाऱ्या कंपनीने केला आहे. एय़रवीव या कंपनीने हे पलंग बनवले आहेत. या पलंगावर 200 किलोपर्यंतचे वजन टाकून त्यांची गुणवत्ता तपासण्यात आली आहे. एवढे वजन अनेकदा पडल्यानंतरही हे पलंग तूटले नाहीत, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. दोन व्यक्ती या पलंगवार झोपल्या किंवा या पलंगवार सेक्स केला तरी हे पलंग तूटणार नाहीत. मात्र, 200 किलोपेक्षा जास्त वजन पडल्यास हे पलंग वाकू शकतात, मात्र, तूटणार नाहीत, असे कंपनीने म्हटले आहे. रिसायकल केलेल्या कार्डबोर्डपासून बनवण्यात आलेले हे पलंग लाकडी किंवा लोखंडी पलंगापेक्षा मजबूत असल्याचे एथलीट गावाच्या व्यवस्थापक ताकाशी किताजिमा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

ऑलंपिक खेळ संपल्यानंतर रिसायकल केलेल्या पदार्थांपासून बनवण्यात आलेल्या वस्तू पुन्हा रियासकाल करण्यात येणार असून त्यांचे पुन्हा कार्डबोर्ड बनवण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी असलेल्या गाद्या आणि अंथरूणे रिसायकल करून त्यांच्यापासून प्लॅस्टिकच्या रिसायकल होणाऱ्या वस्तू बनवण्यात येणार आहेत. जपानच्या टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलंपिकमध्ये सर्व वस्तू रिसायकल आणि इको-फ्रेंडली असणार आहेत. टोकियाोमध्ये होणाऱ्या ऑलंपिकचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. मात्र, सध्या रिसायकल केलेल्या पलंगांची आणि कंपनीच्या दाव्याची चर्चा होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या