#GOODBYE2019 तळीरामांसाठी दारूच्या दुकानात ‘चखणाही’

525
liquor Liqueur

दारूच्या दुकानात पिण्याबरोबरच खाण्याची सोय असेल तर ग्राहक हमखास दुकानांकडे वळतात. नेमके हेच हेरुन दुकानांच्या मालकांनी या ग्राहकांना ‘चखणा’  अर्थात चटपटीत खाद्यपदार्थ पुरवण्याची मस्त आयडिया शोधून काढली आहे. दुकानदारांच्या या अमिषाला तळीराम आकर्षित होत असून दुकानदार मात्र मस्त कमाई करण्याच्या मागे लागले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील देशी दारू व्यावसायिकांकडून नियम सर्रासपणे धाब्यावर बसवले जातात. दुकानाच्या आतमध्ये खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांनी दुकानांची पाहणी करून त्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. अवैध दारूचा पुरवठा करणे नियमभंग करणाऱ्या आदेशाच्या विरोधात संबंधितांचा परवाना रद्द किंवा निलंबित करणे असे अधिकार असतानाही या सर्व नियमांना बासनात गुंडाळून ठेवण्यात येत आहे.

तळीरामांना सेवा पुरवण्यासाठी सकाळपासूनच दारूची दुकाने सुरू होतात. रात्रीपर्यंत दुकानात तळीरामांचा वावर असतो. महत्त्वाचे म्हणजे या दुकानांमध्ये चखण्याची सोय असल्याने तळीरामांची फार मज्जा असते. त्यासाठी विशेष टेबल लावलेले असतात. परंतु हा प्रकार नियमबाह्य असताना अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्याहीपेक्षा अशांकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना चिरीमिरी जात असते

आपली प्रतिक्रिया द्या