2021 च्या हिवाळ्यानंतर हिंदुस्थानात रोज 2.87 लाख कोरोना रुग्ण , संशोधकांचा इशारा

प्रतिबंधक लस आणि औषधांच्या अभावामुळे हिंदुस्थानात 2021 च्या हिवाळ्यानंतर दर दिवशी 2 लाखांपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह सापडतील असा इशारा संशोधकांनी दिला आहे. त्या कालावधीपर्यंत जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 24 कोटींवर जाईल आणि मृतांची संख्या 18 लाखापर्यंत पोहोचेल असाही अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.

एमआयटीच्या स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील संशोधक हाजिर हरमानदाद, तिकाई लिम आणि जॉन स्टरमेन या संशोधकांनी 84 देशांमधील 4.75 अब्ज लोकांच्या तपासणी अहवालांचा अभ्यास केल्यानंतर ही अंदाजित आकडेवारी मांडली आहे. लस आणि औषधाअभावी प्रत्येक देशामध्ये उद्भवलेल्या परिस्थितीचा अभ्यास या संशोधकांनी केला. त्यावरून कोरोनाच्या वेगाचा त्यांना अनुमान लावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या