Lok Sabha election results- इंडिया आघाडीची एकजूट भाजपवर भारी; भाजपने गमावल्या 63 जागा

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून इंडिया आघाडीने भाजपला जबरदस्त टक्कर दिली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यात इंडिया आघाडीची एकजूट भाजपवर भारी पडली असून भाजपने तब्बल 63 जागा गमावल्या आहेत. भाजप सुमारे 240 जागांवर आघाडीवर आहे. मात्र. 2019 मध्ये त्यांनी 303 जागा जिंकल्या होत्या. या वेळी त्यांच्या जागा घटल्या आहेत.

भाजपच्या मतांच्या टक्केवारीत किरकोळ घट झाली आहे. जनमताच्या रोषामुळे त्यांच्या मतांची टक्केवारी जागांच्या स्वरुपात दिसून आली नाही. मतदारांनी मतदानातून त्यांचा रोष व्यक्त केला आहे. 2019 मध्ये भाजपने एकूण मतांपैकी सुमारे 37.36% मते मिळविली होती, यावेळी त्यांना 36.59 % मते मिळाली आहे. म्हणजेच मतांच्या टक्केवारीत फारशी घट नसली तरी जनतेने त्यांना नाकारले आहे. तसेच इंडिया आघाडीने एकजुटीने आणि समन्वयाने उमेदवार निवडले. प्रचारातही त्यांचा चांगला समन्वय दिसून आला. त्यामुळे जनतेने इंडिया आघाडीला मजबूत साथ दिली. हे निकालाच्या आकडेवारीवरून दिसून येते.