लातूर जिल्ह्यात आणखी 21 रुग्ण आढळले; कोरोनाबाधितांची संख्या 556 वर

1707

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत जिल्ह्यातील 216 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यातील 180 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 13 जणांचे अहवाल अनिर्णित आले तर दोघांचे अहवाल रद्द करण्यात आले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 556 वर पोहचली आहे.

लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे लातूरकरांची चिंता वाढत आहे. बुधवारी 216 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 21 जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये चाकूर 1, मजगे नगर लातूर 1, महादेव नगर1, मिश्कीनपूरा 1, एसटी कॉलनी 1, मोतीनगर 1, रामकृष्ण नगर निलंगा 1, कुडूंबले नगर निलंगा 6, रेड्डी कॉलनी उदगीर 3, मुक्रमबाद ता. मुखेड जि. नांदेड येथील 1, अहमदपूर 1, बोरोळ ता. देवणी 1, खाडगाव रोड लातूर 1 तर चांडेश्वर ता. लातूर येथील 1 रुग्णाचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील एकूण 556 कोरोनाबाधित रुग्णांपैकी शहरी भागातील रुग्णांची संख्या 358 एवढी असून ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या 198 एवढी आहे. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत 7 रुग्ण गंभीर स्वरुपातील व्हेंटीलेटरवर आहेत. तर 19 रुग्ण मध्यम स्वरुपातील असून ते ऑक्सीजनवर आहेत. सौम्य स्वरुपाची लक्षणे असणारे 205 रुग्ण असून मध्यम स्वरुपाची लक्षणे असणारे 23 रुग्ण आहेत. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 19 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 235 असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 304 एवढी आहे.

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 193 कंटेन्मेंट झोन असून सध्या 117 कंटेन्मेंट झोन सुरू आहेत. तर 76 झोन बंद आहेत. जिल्ह्यातील 235 कोरोनाबाधित रुग्णांपैकी २३ रुग्ण व्यापारी असून लग्नकार्यात सहभागी होऊन बाधित झालेल्यांमध्ये 32 जणांचा समावेश आहे. तर बाहेरगावावरुन प्रवास करून आलेले 53 जण त्याचप्रमाणे खाजगी कार्यक्रमास उपस्थित राहून बाधित झालेल्यांची संख्या 27 तर जागरण गोंधळ कार्यक्रमात बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 19 व अन्य कारणामुळे बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 81 एवढी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या