ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट 21 विरोधी पक्ष सुप्रीम कोर्टात

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘ईव्हीएम’मध्ये झालेले 50 टक्के मतदान हे व्हीव्हीपॅट (मतदान पोचपावती)शी जुळते की नाही याची खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात यावेत, या मागणीसाठी 21 विरोधी पक्षांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले.

त्या पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर उद्या शुक्रवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. विरोधी पक्षांची ही याचिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, द्रमुकचे एम. के. स्टॅलिन, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला यांनी संयुक्तरीत्या दाखल केली आहे. ही याचिका दाखल करण्यात तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी समन्वयकाची भूमिका बजावली.