सुकमा येथे नक्षलवादी हल्ला, ११ सीआरपीएफ जवान शहीद

43
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । सुकमा

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातल्या भेज्जी येथे शनिवारी सकाळी ९ वाजता नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ११ जवान शहीद झाले आहेत. शहीद झालेले सर्व जवान सीआरपीएफच्या २१९व्या बटालियनमध्ये होते.

नक्षलवादी शहीद जवानांच्या हाती असलेली शस्त्र आणि रेडिओ सेट घेऊन घटनास्थळावरुन निघून गेले आहेत. सीआरपीएफने सुकमा जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करुन नक्षलवाद्यांचा शोध सुरू केला आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांनी हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या