संभाजीनगरमध्ये 22 नवे रुग्ण; कोरोनाबधितांची संख्या 1327 वर

514

संभाजीनगर जिल्ह्यात मंगळवारी 22 रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 1327 एवढी झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. संभाजीनगरमध्ये मंगळवारी आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये जुना मोंढा (1), बायजीपुरा (1), रोहिदासपुरा (1), कांचनवाडी (1), भारतमाता नगर हडको(1), नवीनवस्ती जुनाबाजार (4), जुना हनुमान नगर (1), हनुमान चौक (1), न्याय नगर (1), कैलाश नगर (1), रामनगर (1), एन 8 सिडको (4), रोशन गेट (1), एन 11 सुभाषचंद्र नगर (1), पुंडलीक नगर (1), भवानी नगर (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 11 महिला आणि 11 पुरुषांचा समावेश आहे.

कोरोनाचे आणखी 3 बळी, मृतांची संख्या 58 वर

संभाजीनगर जिल्ह्यात मंगळवारी आणखी 3 कोरोनाबधितांचा मृत्यू झाला. याबरोबर शहरातील कोरोनाबळींची संख्या 58 वर पोहोचली आहे. मंगळवारी झालेल्या मृत्यूमध्ये पहिला मृत्यू जाधववाडी येथील 57 वर्षीय पुरुष रुग्णाचा झाला. या रुग्णास 19 मे रोजी घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. रुग्णाला छाती आणि मेंदूचा क्षयरोग असल्याने स्थिती गंभीर होती. त्याच दिवशी स्वॅब कोरोना पॉझिटिव्ह आल्याने अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. मात्र, मंगळवारी रात्री 12.30 नंतर रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दुसरा मृत्यू जयभीमनगर घाटी येथील 72 वर्षीय पॉझिटिव्ह पुरुष रुग्णाचा झाला. या रुग्णास जिल्हा रुग्णालयातून 14 मे रोजी पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून घाटीत संदर्भित करण्यात आले होते. मंगळवारी पहाटे 1.50 वाजता या रुग्णाचा दमा, उच्च रक्तदाब आणि कोरोनाच्या आजाराने मृत्यू झाला. तिसरा मृत्यू इंदिरानगर बायजीपुरा येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा झाला. या महिलेला दमा आणि इतर त्रासामुळे 25 मे रोजी घाटीत भरती करण्यात आले होते. या महिलेचा सायंकाळी 5.30 वाजता मृत्यू झाला. या 3 मृत्यूमुळे आता शहरातील कोरोनाच्या बळींची संख्या 58 वर पोहोचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या