कोरोनाग्रस्तांच्या यादीत हिंदुस्थान चौथ्या क्रमांकावर, वाचा आजची धक्कादायक आकडेवारी

देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 22,771 कोरोनाग्रस्त आढळून आले असून देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 6,48, 315 वर पोहोचला आहे. या आकड्यानिशी हिंदुस्थान कोरोनाग्रस्तांच्या यादीच चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. हा आकडा असाच वाढत राहिला तर येत्या काही दिवसात आपण तिसऱ्या स्थानावर पोहचू.

हिंदुस्थानात गेल्या 24 तासात 22,771 रुग्ण आढळले असून 442 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 2,35,433 अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्त असून 3,94,227 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 18655 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाग्रस्तांच्या यादीत सध्या अमेरिका पहिल्या स्थानावर असून या देशात 28,90,588 कोरोनाग्रस्त आहेत. त्याखालोखाल ब्राझिलमध्ये 1,543,341 कोरोनाग्रस्त आहे. तर रशियात 6,67,341 व चौथ्या स्थानावरील हिंदुस्थानात 6,49,889 रुग्ण आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या