24 वर्षीय तरुणाला 23 कोटींचे पॅकेज

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंड राज्यातील एका 24 वर्षीय तरुणाने अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. यशवंत चौधरी असे त्याचे नाव असून त्याला जर्मनीतील एका नामांकित कंपनीत वार्षिक 23 कोटींचे पॅकेज मिळाले आहे. या यशाबद्दल यशवंतवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

चंपा जिल्ह्यातील तल्लीहाटचा रहिवासी असलेल्या यशवंत चौधरीला जर्मनीतील टेस्ला गिगाफॅक्टरी या कंपनीत नोकरी मिळाली आहे. वरिष्ठ व्यवस्थापक या पदी त्याची नेमणूक झाली आहे.  चंपावतचे प्रसिद्ध व्यापारी शेखर चौधरी यांचा तो मुलगा आहे. त्याने पिथौरागढ येथून बीटेक केले. त्यानंतर 2020 मध्ये झालेल्या गेट परीक्षेत त्याला राष्ट्रीय पातळीवर 870 वे रँकिंग मिळाले होते. बंगळुरूच्या एका कंपनी प्रशिक्षणार्थी मॅनेजर म्हणून निवड झाली. एक मोठी संधी त्याला मिळाली. कोरोना काळात त्याने घरातून ऑनलाइन काम केले.

ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या काळात यशवंतला बंगळुरू येथे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तो जर्मनीतील बर्लिन शहरात रवाना होईल.