पैठण तालुक्यातील १३ रस्त्यांसाठी २३ कोटींचा निधी

158

सामना प्रतिनिधी । पैठण

पैठण तालुक्यातील १३ रस्त्यांच्या कामासाठी तब्बल २२ कोटी ३८ लाख रुपये, तर २ पुलांसाठी ३ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती आमदार संदिपान भुमरे यांनी दिली.

मुंबई मंत्रालयातील विविध विभागांकडे सतत पाठपुरावा केल्यानंतर हा विकासफंड खेचून आणण्यात आमदार भुमरे यांना यश आले असून, त्यांचे सर्वत्र आभार मानण्यात येत आहे. नवीन आर्थिक वर्षात यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून, तांत्रिक पूर्तता झाल्यावर लवकरच या कामांना सुरुवात केली जाणार आहे, असेही आमदार भुमरे यांनी स्पष्ट केले. संभाजीनगर, बिडकीन, पैठण ते शहागड या रस्त्यासाठी २ कोटी ४४ राख ८० हजार रुपये तर उर्वरित रक्कम ही तालुक्यातील अंतर्गत मार्गावरील खालील रस्ताकामावर खर्च केली जाणार आहे. सोलनापूर, शृंगारवाडी ते आपेगाव (२ कोटी ८० लाख ), बोकूडजळगाव ते बालानगर (१ कोटी ७१ लाख), कापूसवाडी ते बालानगर ( १ कोटी ८९ लाख ), ढोरकीन – कारकीन ते पोरगाव (१ कोटी १० लाख २० हजार ), भुधलवाडी-कातपूर-वरुडी ते कासारपाडळी (१ कोटी ७१ लाख ), कुतूबखेडा – सालवडगाव – चौंढाळा ते चिंचाळा ( १९ लाख ), ढोरकीन – ढाकेफळ ते लोहगाव (५७ लाख), सोलनापूर, शृंगारवाडी ते माऊली जन्मक्षेत्र आपेगाव (३८ लाख), कापूसवाडी, बालानगर (३८ लाख ) आदी. याशिवाय ढोरकीन ते ढाकेफळ व तुळजापूर-विहामांडवा ते केकतजळगाव या दोन्ही रस्त्यांसाठी प्रत्येकी ३ अशा ६ कोटी रुपयांची यापूर्वीच तरतूद केलेली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता रविंद्र बोरकर यांनी सांगितले की, आमदार संदिपान भुमरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा विकास निधी प्राप्त झालेला आहे. केकतजळगाव मार्गावरील २ पुलांंची कामे करण्यासाठीही प्रत्येकी १ कोटी ८० लाख व १ कोटी २० लाख असा फंड वापरला जाणार आहे, असेही उपअभियंता रविंद्र बोरकर यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या