चंदगड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक जाहीर

सामना प्रतिनिधी । चंदगड

चंदगड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींची राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. सरपंचपदासह सर्व रिक्त पदांकरिता २५ फेब्रुवारीला निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणूकीचा निकाल २७ फेब्रुवारीला जाहीर होणार असून यामुळे तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर २२ जानेवारीच्या मध्यरात्रीपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसेच २३ जानेवारीला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. इच्छित उमेदवारांना ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करू शकणार असून १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत या अर्जांची छाननी होणार आहे. १५ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत इच्छित उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हे वाटप करून उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.

पोटनिवडणूक जाहीर झालेली गावे
चंदगड, बुक्कीहाळ, देवरवाडी, आसगोळी, चिंचणे, ढेकोळी, धुमडेवाडी, हल्लारवाडी, इसापूर, जांबरे, जेलुगडे, कागण, करंजगाव, कौलगे, केंचेवाडी, किटवाड, म्हाळेवाडी, मिरवेल, पाटणे, सुंडी, तावरेवाडी, वाघोत्रे या सर्व ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या