संभाजीनगरात 24 तास लसीकरण!

महापालिकेच्या आरोग्य विभागाने मंगळवारपासून शहरात पाच ठिकाणी 24 तास कोरोना लस देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. सिडको एन-8, हाडको एन-11, कैसर कॉलनी, बन्सीलाल नगर, सिल्क मिल कॉलनी येथील आरोग्य केंद्रात ही सुविधा उपलब्ध असणार आहे. ही माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी दिली आहे. रात्री उशिरा घेण्यात आलेल्या निर्णयानुसार मंगळवारपासून शहरात दहा मोबाईल टेस्टिंग टीम वाढविण्यात येणार आहेत. यातील एक टीम मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील  खंडपीठात कार्यरत राहणार आहे. याशिवाय शहराच्या वेगवेगळ्या भागात व्यापक प्रमाणात तपासण्या करण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या