आता 24 तास करा एनईएफटी

154

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आता 24 तास एनईएफटी सुविधा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 16 डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे आठवडय़ाचे सातही दिवस ही सुविधा ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. यापूर्वी ग्राहकांना एनईएफटी केवळ सकाळी 8 ते सायंकाळी 7 तसेच पहिल्या आणि तिसऱया शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेतच करण्याची सुविधा होती.

आपली प्रतिक्रिया द्या