खोटे दागिने बॅँकेत गहाण ठेवून बँकेची ७० लाखाची फसवणूक

50

सामना ऑनलाईन, मालवण

खोटे दागिने खरे असल्याचं बँकेला सांगत त्या दागिन्यांवर कर्जाची उचल केल्याचा प्रकार मालवणात उघडकीस आला आहे. चौके विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील हा प्रकार आहे. या प्रकरणी सोनारासह ९ कर्जदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५ किलो दागिने गहाण ठेवत २४ कर्जदारांनी ७० लाख रूपयांचे कर्ज उचलले होते. बँकेत दागिने गहाण
ठेवण्याआधी ते सोनाराकडून खरे असल्याचं प्रमाणित करणं गरजेचं असतं. सोनारांनी हे सोनं प्रमाणित केल्यानेच बँकेने या ग्राहकांना कर्ज दिलं होतं. बँकेचे व्यवस्थापक कमलाकर धुरी यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंततर त्यांनी पोलिसांकडे याबाबतची तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांनी सोनार आणि ९ कर्जदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उर्वरीत १४ कर्जदारांविरोधात बँकेकडून पत्र मिळताच गुन्हा दाखल केला जाणार आहे. अश्या प्रकारे खोटे दागिने ठेवत लाखो रुपयाची फसवणूक केल्याचा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकार असल्याचेही बोलले जात आहे.

गेले वर्षभर कर्जदार यांच्याकडून दागिने बँकेत ठेवण्यात आले. त्यानंतर कर्जदारांनी कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने कर्जदारांना नोटीस पाठवली मात्र त्याचीही कर्जदारांनी दखल घेतली नव्हती. त्यानंतर बॅँकेने दागिन्यांचा लिलाव कुडाळ मुख्य कार्यालयात लावला. त्यावेळी अन्य सोनारांनी दागिने खोटे असल्याचे सांगितल्यानंतर फसवणुकीचा प्रकार समोर आला.

 

आपली प्रतिक्रिया द्या