रत्नागिरीत सोमवारी 25 रुग्ण बरे होऊन परतले; जिल्ह्यात 614 जणांची कोरोनावर मात

540

रत्नागिरीत सोमवारी 25 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत 614 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 70 टक्के आहे़. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सोमवारी आणखी 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले़. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता 877 झाली आहे़. सध्या रुग्णालयात 270 रुग्ण उपचार घेत आहेत़. एका कोरोनाबाधित रुग्णाचा सोमवारी मृत्यू झाला़. आतापर्यंत 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़. रत्नागिरीतील लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असून बाजारपेठेतील दुकाने खुली झाली आहेत. प्रत्येक विभागाला प्रशासनाने वार नियोजित करून दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या